जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीत नव्या सरकारची निवड उंबऱ्यावर येऊन ठेपलीये. १९ एप्रिल ते १ जून २०२४ या काळात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. आणि आम्ही नेहमीप्रमाणे भारताच्या गावपाड्यांमधल्या वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन तिथला कौल कुणाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकरी, शेतमजूर, जंगलात राहणारे आदिवासी आणि अन्य समुदाय, स्थलांतरित आणि समाजाच्या परिघावरच्या अनेकांशी पारीच्या वार्ताहरांनी संवाद साधला. सगळेच अगदी मूलभूत गरजांपासून आजही वंचित आहेत. नळाला पाणी, घरी आणि शेतात वीज आणि लेकरांना रोजगार. राजकीय लाभासाठी सुरू केलेल्या धार्मिक तंट्यांमुळे काहींना आपल्या जिवाची भीती आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकींचं आमचं संपूर्ण वार्तांकन इथे वाचा