‘पावसाबरोबर माझी कलाही गायब होईल, कुणाला माहित होतं?’
पश्चिम महाराष्ट्राच्या केरले गावचे संजय कांबळे शेतकरी आहेत आणि बांबूचे कारागीर. हाताने इरलं बनवणाऱ्या दादांची ही कला कमी पाऊसमान आणि सहज मिळणाऱ्या प्लास्टिकच्या रेनकोटमुळे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे