तारपा तोंडाला लावला की राजू डुमरगोईचे गाल फुगतात. बांबू आणि वाळलेल्या दुधीपासून बनवलेल्या या पाच फुटी वाद्यामध्ये जीव येतो आणि त्यातून निघणारा स्वर हवेत भरून राहतो.
२०२० साली २७-२९ डिसेंबर या काळात छत्तीसगडच्या रायपूरमध्ये राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव भरला होता. तिथे राजू आपलं हे अनोखं वाद्य वाजवत होता.
क ठाकूर आदिवासी असलेला राजू पालघरच्या गुंडाचा पाडा या छोट्याशा पाड्यावरून इथे आला होता. महाराष्ट्रात दसरा, नवरात्र आणि इतर सण सोहळ्यांमध्ये तारपा वाजवला जातो.
वाचाः “ माझा तारपा हीच माझी देवता ”