फसवणूक करून मुंबई-वडोदरा महामार्गासाठी निंबवलीच्या वारल्यांच्या जमिनी लाटण्यात आल्या. या प्रकल्पाने गाव दोन तुकड्यात दुभंगलं आहे आणि मोबदलाही अपुरा आहे
पत्रकार ममता परेड (१९९८-२०२२) हिने २०१८ साली पारीसोबत इंटर्नशिप केली होती. पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून तिने पत्रकारिता आणि जनसंवाद विषयात पदव्युत्तर पदवी घेतली होती. आदिवासींच्या, खास करून आपल्या वारली समुदायाचे प्रश्न, उपजीविका आणि संघर्ष हा तिच्या कामाचा गाभा होता.