बदलते तंत्रज्ञान आणि प्रेक्षकांच्या आवडीनिवडी, खेळासाठीच्या कमी होत चाललेल्या जागा आणि इतरही अनेक घटकांचा तमाशावर परिणाम होत आहे. तमाशा फडांचे अनुभवी मालक याकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहतात – रत्नागिरीच्या रघुवीर खेडकरांच्या मते तमाशा संकटात आहे तर सातारच्या मंगला बनसोडेंना मात्र ही कला टिकून राहणार यावर विश्वास आहे.