काँक्रीटच्या खुराड्यातः मातीतले आदिवासी इमारतीत कैद
मुंबई महानगरीच्या पोटातलं एक अख्खं आदिवासी गाव मेट्रोच्या डब्यांचा कारखाना बांधण्यासाठी नकाशावरून पुसून टाकण्यात आलंय आणि त्या गावाच्या रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या खुराड्यांमध्ये कोंबून टाकलंय