वयाची सत्तरी आली तरी शेतकऱ्यांच्या मोर्चात मैलोनमैल पायी जायला त्या तयार असतात. दोन महिन्यांपूर्वी लाँग मार्चमध्ये त्या होत्या आणि आता डहाणूच्या ३ मे च्या मोर्चामध्येही त्या आहेत. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ‘चलो दिल्ली’ म्हणायलाही त्या मागे पुढे पाहणार नाहीत