प्रत्येक भाषेत साहित्याचं भंडार, ज्ञानाचे स्त्रोत, वैश्विक दृष्टी दडलेली असते असं हा गुजरातेतला हा आदिवासी कवी आपल्याला सांगतो. देहवली भिली भाषेतल्या आपल्या कवितांमधून तो हा खजिना आपल्यासमोर उभा करतो. कवितांच्या मालिकेतली ही पहिली कविता
जितेंद्र वसावा गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातल्या महुपाडा गावी राहतात आणि देहवाली भिलीमध्ये कविता करतात. २०१४ साली त्यांनी आदिवासी साहित्य अकादमी स्थापन केली. आदिवासींचा आवाज मुखर व्हावा यासाठी त्यांनी लाखरा नावाचे कवितेचे मासिक सुरू केले असून त्याचे ते संपादक आहेत. आदिवासींच्या मौखिक साहित्यावर त्यांची चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा पीएचडीचा अभ्यास नर्मदा जिल्ह्यातल्या भिल आदिवासींच्या मौखिक कथांमधले सांस्कृतिक पैलू आणि मिथ्यांवरती होता. लवकरच त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. पारीवर प्रसिद्ध झालेल्या सर्व कविता या संग्रहातील आहेत.
See more stories
Illustration
Labani Jangi
मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.
See more stories
Translator
Ashwini Barve
अश्विनी बर्वे नाशिक इथे राहतात. त्या आकाशवाणीसाठी श्रुतिका व इतर लेखन करतात.