हिरव्या कंच भातशेतात उभं राहून नोरेन हाजरिका मनापासून गातायत. थोड्याच दिवसात भात पिकून सोनेरी होईल. ७० वर्षीय हाजरिकांसोबत ढोल वाजवतायत ८२ वर्षीय जितेन हाजरिका आणि ताल वाजणारे ६० वर्षीय रोबिन हाजरिका. तिताबर तालुक्यातल्या बालिजान गावातले हे सीमांत शेतकरी आहेत. तरुणपणी तिघंही अगदी उत्तम बिहुआ म्हणजेच बिहु कलाकार होते.
“तुम्ही कितीही सांगा, ‘बिहु रङाली’च्या गोष्टीच उदंड आहेत! ”
भातकाढणीचा हंगाम (नोव्हेंबर-डिसेंबर) जवळ यायला लागला, भातं पिवळी झाली की थोड्याच दिवसांत इथल्या धान्याच्या कणग्या बरा, जहा, आइजुं या भाताच्या वाणांनी भरून जातील. भात घरी येणं ही चुतीया समुदायासाठी अगदी सुखा-समाधानाचं काम असतं आणि तेच बिहु-नाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या गाण्यांमधून दिसून येतं. आसामच्या योरहाट जिल्ह्यातल्या हा समुदाय पिढ्या न् पिढ्या ही गाणी गातोय आणि सुगी साजरी करतोय. चुतीया आदिम समाज असून बहुतकरून शेती करतात. उत्तर आसाममध्ये त्यांच्या वस्ती जास्त आहे.
थोक ही एक आसामी संज्ञा आहे. सुपारी, नारळ आणि केळी अशा तीन घडांना मिळून थोक म्हटलं जातं आणि हे घड म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहेत. ‘मोरमोर थोक’ आणि ‘मोरोम’ या गाण्यांमध्ये आलेला उल्लेख प्रेमासंबंधी आहे. शेतकरी समुदायासाठी ही समृद्धी, उदंड प्रेम फार मोलाचं आहे आणि त्यामुळेच या प्रेमाची गाणी गाताना त्यांच्या आवाज या भातशेतांमध्ये निनादत राहतो.
“गाताना काही चुकलं तर माफ करा”
गीतांची ही परंपरा विरून जाऊ नये म्हणून तरुण पिढीनेही हे संगीत शिकावं अशी त्यांची मनापासून इच्छा आहे.
“ओ सोणमोइना,
सूर्य आपल्या मार्गाने निघालाय”