दुष्काळ आणि आर्थिक विवंचनांनी गांजलेल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना आता नवाच घोर लागून राहिला आहे – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या वन्य प्राण्यांचे हल्ले आणि बळी. राज्य शासनाकडून फारशी काहीच मदत नसल्याने त्यांना स्वतःलाच यावर उपाय शोधावे लागत आहेत