ब्रह्मपुत्रेमध्ये अशी अनेक बेटं आहेत ज्यांची सतत धूप होत असते आणि ती पाण्याखाली जाण्याचा धोका असतो. त्यांना चार असं म्हणतात. रोज सकाळी अशा बेटांवरून मजुरांना घेऊन नावा आसामच्या धुबरी जिल्ह्यातल्या धुबरी शहरात येऊन पोचतात. शेजारच्या मेघालय राज्यातून बांबूनी बनवलेले तात्पुरते तराफे वाहत वाहत धुबरीमध्ये गदाधर आणि ब्रह्मपुत्रेच्या संगमापर्यंत येऊन पोचतात.

मात्र या संगमावर आता उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन दशकात बांबूच्या पट्ट्यांची मागणी कमी झाली आहे. बांबूंपासून कुंपण, चौकटी बनवतात, भिंती आणि लाकडी प्लाय बनवायलादेखील बांबूचा काही भाग वापरतात. पण आता चार बेटांवर राहणाऱ्यांनी पूर्वापार चालत आलेली बांबूची गवताने शाकारलेली घरं बांधणं थांबवलं आहे. त्याऐवजी ते आता इकडून तिकडे हलवता येतील अशी घडी घालता येण्यासारखी पत्र्याच्या भिंती आणि छत असणारी घरं उभारत आहेत. पश्चिम बंगाल आणि बिहारमधूनही बांबूच्या पट्ट्यांची मागणी घटली आहे. तिथे स्वस्तात घरं बांधण्यासाठी विटा किंवा पत्र्याचा वापर वाढला आहे.

Workers arriving from the different islands on the Brahmaputra river to work in Dhubri town.
PHOTO • Ratna Bharali Talukdar

ब्रह्मपुत्रेच्या विविध बेटांवरून कामगार धुबरीला येतायत

पस्तिशीचा मैनुद्दिन प्रामाणिक रोज कुंतीर चार वरून धुबरीला येतो. त्याला चार लेकरं आहेत आणि कोयत्याने बांबूच्या सुबक पट्ट्या करणे हाच त्याचा पोटापाण्याचा धंदा आहे, ज्याला स्थानिक भाषेत बाशेर काज (बांबूचं काम) असं म्हणतात. तो आठ तासात सरासरी २० बांबूच्या पट्ट्या करतो ज्यासाठी त्याला रु. २५० रोजगार मिळतो. मैनुद्दिनसारख्या इतरही बांबू कारागिरांना स्थानिक मुकादम इथे घेऊन येतात. हल्ली फारसं कामच नाहीये, तो सांगतो, जास्तीत जास्त वर्षाकाठी सहा महिने.

Mainuddin Pramanik, 35,  also comes to Dhubri every day from Kuntir char
PHOTO • Ratna Bharali Talukdar
Mainuddin Pramanik, 35,  also comes to Dhubri every day from Kuntir char
PHOTO • Ratna Bharali Talukdar

मैनुद्दिन प्रामाणिक (डावीकडे) आठ तासात २० बांबूच्या पट्ट्या करतो ज्यासाठी त्याला २५० रुपये रोजगार मिळतो; धुबरीला नावांच्या घाटावरती गोळा झालेल्या बांबू कारागिरांपैकी एक रजौल करीम (उजवीकडे)

Each bamboo log is split into three parts – the top layer is very smooth and used in making bamboo walls; the middle layer is also used for walls, but it’s not so smooth; and the bottom layer is used as a filler in wooden plyboard
PHOTO • Ratna Bharali Talukdar

कोयत्याने बांबूच्या पट्ट्या करणेः हे काम आता वर्षाकाठी फक्त सहा महिनेच मिळू लागलंय

प्रत्येक बांबूचे तीन भाग केले जातात – सर्वात वरचा भाग गुळगुळीत असतो तो बांबूच्या भिंती उभारण्यासाठी वापरला जातो; मधला भागही भिंतींसाठी वापरतात, पण तो एवढा गुळगुळीत नसतो; सगळ्यात खालचा भाग लाकडी प्लाय तयार करण्यासाठी माल म्हणून वापरतात.

दर महिन्याला दोन ट्रक माल ते दोन महिन्याला एक ट्रक इतका धंदा उतरला आहे

मजूर बांबूच्या पट्ट्या रस्सीने बांधतात आणि त्याचे गठ्ठे लावून ठेवतात. नंतर हे बाहेर पाठवण्यासाठी ट्रक किंवा इतर मालवाहतुक करणाऱ्या वाहनात लादले जातात. बांबूच्या पट्ट्या ठेवायला भरपूर जागा लागते. त्या लवकर खराब होतात ज्यामुळे बाजारातली त्यांची किंमत कमी होते. मग केवळ स्वस्तात सरपण म्हणून असा बांबू विकायला लागतो.

The labourers tie the split bamboos with ropes and stack the bundles at the worksite, to be later loaded onto trucks and other vehicles for transportation
PHOTO • Ratna Bharali Talukdar
Split bamboos require large storage spaces
PHOTO • Ratna Bharali Talukdar

बांबूची साठवणः धुबरीच्या संगमावर नावांच्या घाटांवर नेहमी आढळणारं दृश्य

The steady demand for split bamboos on the chars has declined because people living on the shifting islands now prefer innovative folding houses of tin.
PHOTO • Ratna Bharali Talukdar

घरबांधणीसाठी चार बेटांवर आता पत्र्याला जास्त मागणी आहे

चार बेटांवर राहणाऱ्या लोकांना बांबूची कायम गरज असायची ती आता कमी झाली आहे. सततच्या पुरांमुळे किंवा जमिनीची धूप होत असल्यामुळे त्यांना घरं हलवावी लागतात. मात्र आता बांबूऐवजी घडी घालता येईल अशा आणि जास्त टिकाऊ असणाऱ्या पत्र्याच्या घरांना त्यांची जास्त पसंती आहे.

पूर्वी वनातल्या रोपांना संरक्षण म्हणून बांबूच्या विणलेली तट्टं वनविभागाकडून मोठ्या प्रमाणावर विकत घेतली जात. पण आता वन खातं लोखंडी किंवा प्लास्टिकच्या जाळ्या वापरू लागलं आहे. बांबूची मागणी कमी होण्यामागचं हेही एक कारण.

Radhakrishna Mandal (extreme right), is a contractor. Workers working on bamboo in the background.
PHOTO • Ratna Bharali Talukdar

मुकादम असणारे राधाकृष्ण मोंडल १० रुपये नग या दराने बांबू खरेदी करतात

मुकादम दर मंगळवारी आणि गुरुवारी रोजगार देतात, दोन्ही बाजाराचे दिवस. मैनुद्दिनचे मुकादम राधाकृष्ण मोंडल १० रुपये नग या दराने बांबू खरेदी करतात. त्यांच्याकडे मैनुद्दिन व इतर सात कामगार बांबूच्या पट्ट्या करण्यासाठी कामाला आहेत.

अगदी चार वर्षांमागे मोंडल दोन ट्रकभरून बांबूंच्या पट्ट्या पश्चिम बंगाल आणि बिहारला पाठवायचे. आता, ते सांगतात, दोन महिन्याला एखादा ट्रक जातो.

धुबरी गावातले नावांचे चार घाट एकूण ३५० चार बेटांशी जोडलेले आहेत. आणि या चारही घाटांवर बांबूच्या पट्ट्या करणे हेच काम सगळ्यात जास्त चालतं आणि तीच लोकांची उपजीविकाही आहे. प्रत्येक घाटावर किमान सात मुकादम त्यांचा व्यवसाय करतायत.

PHOTO • Ratna Bharali Talukdar

रोजगाराच्या शोधात आजूबाजूच्या बेटांवरून आलेल्या कामगारांची धुबरीमध्ये कायम वर्दळ असते, मैनुद्दिन आणि इतरांपुढे रोजगाराचे दुसरे काहीही पर्याय उपलब्ध नाहीत.

जरी धंदा बसलेला असला तरी मैन्नुदिनकडे कामाचे इतर फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. ३५० चार बेटांहून बिगारी कामाच्या शोधात – माथाडी, हमाल, रिक्षा ओढणारे, गॅरेजमध्ये काम करणारे, इत्यादी – धुबरीला येणाऱ्यांची संगमावर झुंबड उडालेली असते.

Ratna Bharali Talukdar

রত্না ভরালি তালুকদার ২০১৬-১৭ সালের পারি ফেলো। ভারতের উত্তরপূর্ব অঞ্চলের নেজিন নামে একটি অনলাইন পত্রিকার এক্সিকিউটিভ সম্পাদক তিনি। বিভিন্ন এলাকায় ঘুরে ঘুরে পরিযান, বাস্তুচ্যুতি, শান্তি, যুদ্ধ, পরিবেশ তথা লিঙ্গের মত হাজারো বিষয়ের উপর লেখালেখি করেন রত্না।

Other stories by রত্না ভরালি তালুকদার
Translator : Medha Kale

পুণে নিবাসী মেধা কালে নারী এবং স্বাস্থ্য - এই বিষয়গুলির উপর কাজ করেন। তিনি পারির মারাঠি অনুবাদ সম্পাদক।

Other stories by মেধা কালে