१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथे उसळलेला हिंसाचार पाहिल्यावर संतप्त आणि उद्विग्न झालेल्या सुयश कांबळेनी लिहिलेल्या कवितेचं हे शीर्षक. कोल्हापूरच्या शिरदवाड गावच्या या २० वर्षीय प्रतिभावान दलित कवीला पत्रकार व्हायचंय. कारण, तो म्हणतो, ‘... एक चांगला पत्रकार कधीही गप्प राहणार नाही’