आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मार्च महिन्यात चालू झालेल्या आमच्या ओवी संग्रहातल्या या पुढच्या ओव्या. महाराष्ट्रातल्या नांदगावच्या कुसुम सोनावणे बाईवरचा जुलुम, पुढ्यात असलेल्या जाचाची तिच्या मनातली भीती आणि बाई म्हणून आपला जन्म वायाच गेला का? हा कायमच सतावणारा प्रश्न त्यांच्या ओव्यांमधून गातात.