दामोदर नदीच्या किनारी, आमटा गावात, शेती आणा मासेमारी हे दोन प्रमुख व्यवसाय आहेत. इथल्या बाया घरून शिफॉन आणि जॉर्जेटच्या साड्यांवर खड्यांचं काम नगावर करतात. साध्या साड्यांवर त्यांनी केलेली खड्यांची नक्षी म्हणजे एक कलाविष्कारच असतो.
पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागात अनेक घरांमध्ये बाया हे काम करतायत. त्यातून त्यांच्या हातात पैसा येतो, घरी हातभार लागतो आणि स्वतःच्या पायावर उभं असल्याचीही जाणीव निर्माण होते.
पश्चिम बंगालच्या दुकानांमध्ये या अशी खडे लावलेल्या साड्या २,००० रुपयांच्यापुढेच विकल्या जातात, पण या बायांना मात्र त्यातला अगदी क्षुल्लक वाटा मिळतो – एका साडीमागे २० रुपये.
२०१५-१६ साली पारी फेलोशिपचा भाग म्हणून सिंचिता माजी हिने ही गोष्ट आणि व्हिडिओ तयार केला आहे.
अनुवादः मेधा काळे