कोसी नेपाळमधून बिहारमध्ये वाहत येते. ही एक अस्वस्थ नदी आहे जी सारखी आपलं पात्र बदलत असते. गेल्या काही वर्षांत तिला बांध घालून एकाच वाटेने वाहण्याची सक्ती करण्यात आली आहे. आता खरं तर नदीला भिंती घालून कसं अडवणार? पण तरीही अनेक किलोमीटर लांब मातीच्या भिंती उभारण्यावर सरकार ठाम आहे. जेव्हा नदीची पातळी वाढते तेव्हा लोक हे बांध फोडतात जेणेकरून पाणी वाहून जाईल अन्यथा त्यांना जलसमाधी मिळणार हे निश्चित. तरीही वर्षामागून वर्षं सरली तरी सरकार नव्याने हे बांध घालत आलंय. आणि यामुळे सतत इथे संघर्ष सुरू आहे.

लोकांचं रक्षण करण्यासाठी उभारलेले हे बांध अनेकदा पाण्याखाली गेले आहेत. १९८४ साली कोसीने पात्र बदललं, बांध पाण्याखाली गेले तो आतापर्यंतचा सर्वात जीवघेणा पूर होता, अनेक गावं वाहून गेली, अनेक जण बुडाले आणि लाखो बेघर झाले. १९८७ साली आलेल्या पुरातही अनेक बांध पाण्याखाली गेले.

इथल्या लोकांच्या मुखी पुराचा विषय कायमच असतो – आणि खरं तर जुने आणि नवे बांध बांधले जात असताना तो अधिकाधिक जीवघेणा झाला आहे.

या फिल्मचं चित्रीकरण जुलै ते सप्टेंबर २०१५ दरम्यान करण्यात आलं. सायंतनी पालचौधुरीच्या २०१५ पारी फेलोशिपअंतर्गत ही फिल्म तयार करण्यात आली. 

कॅमेरा व संकलन संबित दत्तचौधुरी याने केलं आहे. स्वयंभू छायाचित्रकार असलेला संबित गेल्या दोन वर्षांत शेती, सामुदायिक आरोग्य आणि शिक्षणविषयक कामामध्ये सहभागी झाला आहे.

अनुवादः मेधा काळे

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

Sayantoni Palchoudhuri

Sayantoni Palchoudhuri is an independent photographer and PARI Fellow, 2015. Her work focuses on documenting a broad range of development, health and environment issues across India.

Other stories by Sayantoni Palchoudhuri