सकाळच्या पहरी कोण गोसावी गं दारी आला
काई सांगु बाई तुला वाढवी कशा गं भिकशा तू गं त्याला
असा सकाळच्या पारी धर्म चांगुणानी केला
धर्म चांगुणानी केला, अंगी देव तो गं राबवीला
असा धर्माचा डावू जिला येतो ना गं तिनी केला
नको म्हणू नासविला, देव उभा तो गं राहिला
हाच धर्माचा डावू कोण घालीतं गं पंगयती
काय म्हणं नासविला, पांडुरंग तो गं रंगतो संगयती
जिच्या कुळीला धर्म चा धर्म, तिच्या लेकीनी चालू केला
गेली लांब वनामधी देव तिथं, तिला साह्य झाला
पाची बोटाचा गं धर्म करी जिवाची सोडवणं
अशी वार्याच्या झगरीनी, कशी उडाली कवळी पानं
असा धर्माचा डावू देते केळीच्या पानावरी
काई यातं मिळाईला भुकेल्याची जाणं करी
आला माझ्या दारामधी देते प्यायला नितं पाणी
येम गेला फिरवूनी भुकेल्याची जाणं करी
असा धर्माचा डावू माझा मला तो गं मिळईला
गेली व्हती देऊळाला सारासारा तो गं कळईला
आस दुबळं-माझं-पण मला कुणी ते गं हिणविलं
देवाला ना जोडी हात, कसं शर्थीनी चालविलं
दुबळं-ना-माझं-पणं मारी वस्ताराला गाठी
किती नाव संभाळीला, सभा घेतल्याना माझ्या गोठी
असा दुबळ्यापणाला नको भाऊ तू रे डगमगू
असा निघूनी जाईल चंद्रावरीला रे काळा ढगू
आस दुबळ्यापणाला नको होऊस रे आयाहुया
आस निघूनी जाईल चंद्रावरली रे काळी साया
अशी दुबळ्यापणाईची कसा करतो हेळयणा
दुपारची सावली आला काखत रे झोळयणा
अशी दुबळ्यापणाईची कोण करीतो टिंगईल
तुझ्या मरणाच्या वेळी सारं काही तो सांगईल
दुबळ्यापणाईला काही बोलावरं तोडून
जाई मोगर्याची कळा गेली वार्यानी रे पडूनी
पूर्वी जलमाच्या किर्ती गेल्या जगात पांगून
नको मज लाडवू देते तुम्हांला रे सांगून
बिहनिया-बिहनिया दुवार मं ठाढ़े बाबा-बैरागी
कुछु नइ ये घर मं, सोचंव वोला काय देवंव दाई
बिहनिया-बिहनिया चांगुना करिस भिच्छा दान
नेक मन ले हिरदे मं ओकर बस गे भगवान
जेन ला होवय सत धरम अऊ दया के ग्यान, सहज निभाय वोला
बढ़िया करम, होय न कभू बिरथा, भगवान देखत हवय सब्बो ला
ये समाज मं कोन ढोवत हवय अच्छाई के बोझा
सत करम मं बसे पांडुरंग (देंवता), कुछु न जावय बिरथा
जेन कुल ह माने धरम, संतान घलो चले उहिच रद्दा
सुजन संग भगवान जावय ,चाहे रद्दा कतको दूरिहा
असल दान उहीच जऊन अपन हाथ ले होय जान
मीनमेख निकरेइय्या उड़ जाथें जइसने सूक्खा पान
दया-मया संग भोजन परोसे आय धरम के सुग्घर रूप
भूखाय ला खवाय, बिन सुवारथ समझे ओकर पीरा-दुख
मुहटा मं मनखे पियासा, मया ले वोला पिवाय पानी
जमराज घलो लहूट गे, देख-जान दुख के कहिनी
मोर हिरदे के नेकी मं बसे हवय किस्मत ह मोर
दया-धरम के रद्दा धरेंय, रद्दा मंदिर के सुग्घर
गरीब जान दीगर मन करिन मोर कतको अपमान
मोर जिनगी कतक मुस्किल फेर भरोसा तोर भगवान
मंय गरीब , तन ढाकंव, पारके गाँठ फरिया-लुगरा
तब ले घलो कतको ताना सुनत, पहाये दिन रतिहा
अतक दुब्बर झन बन भाई, डोलत रहिबे नइ तो तंय
जइसे चंदा उपर बादर छंटय वइसे दुख घलो बीतय
गरीब हस कमजोर नइ, तंय हिम्मत झन हार
छोड़ झं आस, बखत आय ले छंट जाथे अंधियार
कइसने दीन-गरीब के ये दुनिया करथे अपमान
दिन बीतत परछाई घलो रहे न कभू समान
मोर गरीब के ये कोन करत हवय निंदा-अपमान
मरे बखत सुनाही तोला अपन फइसला भगवान
कठोर बोली कोंवर मन ला गहिर ले करे मार
जइसने मोंगरा झर जाये थोर पवन के मार
गये जमाना नेकी-भलाई के जस बगरे जब दुनिया पार
बिरथा झन सराहो मोला, कहत हवं सच्चा मन ले अपार
*गोसावी (बाबा-बैरागी) वो मइनखे आय जऊन ह दीन-दुनिया के माया-मोह ला छोड़ दे हवय. वो ह भगवा कपड़ा पहिरथे. ये ह एक ठन अइसने जात के नांव घलो आय जेन मन के काम धरम-करम के रहिथें.