“सौम्य राग दाखवण्यासाठी डोळे किंचित वर केले पाहिजेत…तीव्र राग दाखवण्यासाठी, डोळे मोठे केले आहेत, भुवया उंचावलेल्या आहेत. आनंदासाठी, गाल हसत हसत वर केले आहेत.”
सरायकेला छाऊ नृत्यात वापरले जाणारे मुखवटे बनवणाऱ्या दिलीप पटनायक या झारखंडच्या निपुण कारागीराच्या कामाने तपशीलांकडे लक्ष वेधले आहे. “मुखवट्याने पात्र प्रतिबिंबित केले पाहिजे.” असं ते सांगतात. “सरायकेला मुखवटे अद्वितीय आहेत कारण ते नवरस, नऊ भावनांना मूर्त रूप देतात, जे इतर कोणत्याही छाऊ शैलीत नाही.”
पूर्ण होण्याच्या विविध टप्प्यात असणारे मुखवटे त्यांच्या कामाच्या ठिकाणी सगळीकडे दिसतात. रुंद डोळे, कोरीव बारीक भुवया, चमकदार कांती, लक्ष वेधणारे चेहऱ्यावरचे भाव हीत्यांची वैशिष्ट्ये अद्वितीय आहेत.
ही कलाकृती नृत्य आणि मार्शल आर्ट्स यांचं मिश्रण करते आणि नर्तक हे मुखवटे घालतात कारण ते रामायण, महाभारत आणि स्थानिक लोककथांतील कथा सादर करतात. दिलीप सर्व मुखवटे बनवतात पण कृष्णाचा मुखवटा त्यांचा आवडता आहे, कारण, “[तरी] मोठे डोळे आणि भुवया उंच करून रागाचं चित्रण करणं सोपं आहे, पण खोडकरपणा दाखवणं इतकं सोपं नाही.”
खरंतर दिलीप हे छाऊ कलाकार देखील आहेत. लहानपणी ते छाऊ नृत्य गटाचा भाग होते आणि छाऊ उत्सवादरम्यान स्थानिक शिव मंदिरातील कार्यक्रम पाहून ते नृत्य शिकले. कृष्णाचं नृत्य हा त्यांचा आवडता भाग आहे. आज ते ढोल (ढोलकी) वाजवतात आणि सरायकेला छाऊ गटाचा भाग आहेत.










