नामघरची जमीन मातीच्या दिव्यांनी उजळून निघाली आहे. दिव्यांच्या मंद प्रकाशात मातीचा गंध दरवळतो, आणि येणारे प्रेक्षक त्या मंद प्रकाशात प्रेक्षक बसण्यासाठी आपापल्या जागा निवडतात. गायक आणि वादक रांगेत उभे राहतात. वादक आपल्या छातीवर पारंपरिक असमिया वाद्य ‘खोल’ टेकवतो; तर मोठ्या पितळी झांजांमधून (बोर टाळ) दिव्यांचा उबदार प्रकाश परावर्तित झाल्याचं आपल्याला दिसतं. लोकधून वाजायला सुरुवात होते.
संगीताच्या पटलावर सूत्रधार बोलू लागतो. आजची संध्याकाळ सूत्रधाराची असते. सर्वत्र शांतता पसरते. त्यानंतर प्रकाशाच्या झोतात बिपुल दास पुढे येतो.
आणि आसामच्या पारंपरिक वैष्णवांचं रात्रभर चालणारं ‘भाओना’ नाटकाचं सादरीकरण होतं. ही सुरू नाटकं प्रामुख्याने रामायण आणि महाभारतामधल्या कुठल्यातरी एखाद्या प्रसंगावर आधारित असतात, ज्यात भक्ती आणि नाट्य यांचा अगदी सुंदर मिलाफ दिसून येतो.
या नाटकातली बिपुल दासला सर्वाधिक आवडणारी भूमिका म्हणजे ‘कुंती’ महाभारतातील पांडवांची आई. “गावातले लोक तर मला ‘कुंती’ म्हणतात,” तो सहज हसत सांगतो. केवळ आईनेच पालन पोषण केलेल्या बिपुलला आपली नाळ मातृत्वाशी सहजपणे जोडली गेली आहे असंच वाटतं. “माझ्या आत एक आई आहे, जी मला कुंतीच्या व्यक्तिरेखेशी जोडते,” तो म्हणतो. मग तो नाटकातली त्याची खास आवडती अशी पदं गाऊ लागतो:
















