“आम्ही आमचं आदिवासी खाणंच भुलून गेलो होतो,” यवतमाळच्या चंदा घोदाम म्हणतात.
भारताच्या गावपाड्यांमधल्या ७५ टक्क्यांहून अधिक महिला शेतीत काम करतात. पण शेती किंवा पशुधनाची मालकी मात्र फारच थोड्या महिलांकडे आहे. नैसर्गिक संसाधनांवर देखील त्यांना पुरेपूर अधिकार मिळत नाही. अन्नधान्य पिकवण्यात किंवा जैवविविधतेचं रक्षण करण्यात महिला आघाडीवर असल्या तरीही समाजात त्यांना आजही शेतकरी ही ओळख मिळालेली नाही.
महाराष्ट्रातील विदर्भ - मराठवाडा विभागातील दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील चंदाताईंसारख्या महिला त्यांना येणाऱ्या वेगवेगळ्या आव्हानांवर मात करून शेतीमध्ये क्रांती घडवत आहेत.
“आन् मी बायाले पण सांगतो की आपल्याच वावरात सर्व होती,” चंदाताई तोंडभर हसतात.
मकाम - महिला किसान अधिकार मंचाच्या सहकार्यातून सोपेकॉम या संस्थेची निर्मिती असलेली ही चित्रफीत खास ८ मार्चच्या निमित्ताने.


