“मिक्सर किंवा इलेक्ट्रिक रवीसारख्या मशीनमुळं या पारंपरिक पद्धतींचा वापर यापुढं कुणीच करणार नाही.” एका भांड्यामध्ये दही घुसळताना रायली बाई जोराने बोलत होती. हे दही घुसळण्यासाठी जाड सुती दोरी गुंडाळेला नेतरा वापरत होती. तिच्या मागे असलेल्या टेकडीवर पक्ष्यांचा किलबिलाट स्पष्ट ऐकू येत होता.
गुजरातच्या सीमेजवळ, राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातल्या उपलागढ गावात सकाळचे ५.३० वाजले होते. हा डोंगराळ प्रदेश असून इथल्या गावातले रस्ते चढ-उताराचे आहेत. त्यामुळे इथं मोटारसायकल चालवणं कठीण आहे. इथले लोक वाहतुकीसाठी हेच साधन वापरतात. इथल्या रस्त्यांमध्ये कमी उंचीच्या छताची काही कच्ची आणि पक्की घरं दिसतात. रायली बाईच्या पक्क्या घरांप्रमाणेच, बऱ्याच घरांमध्ये दोन खोल्या, एक स्वयंपाकघर आणि एक व्हरांडा दिसतो. रायली बाईचं घर गावापासून दूर टेकडीवर आहे, ते टेकडीच्या अगदी टोकावर आहे.
रायली बाई आणि इतर बरेच गावकरी गरसिया समुदायाचे आहेत, ज्यांनी नोंद राज्यात अनुसूचित जमाती म्हणून केलेली आहे. वयाच्या चाळीशीत असलेल्या रायली बाईनं शाळा कधी पाहिलीच नाही. हे इथे काही नवीन नाही, कारण उपलागडमधील फक्त १० टक्के महिला आणि २७ टक्के पुरुष साक्षर आहेत (जनगणना २०११)








