श्रीलाल सहानी एक वादक आहेत. स्थानिक लोक त्यांना लखपतीबाबू म्हणूनच ओळखतात. ते पश्चिम बंगालमधील बोलपूरमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात. सायकलवरती मागे बांधलेले ढोल आणि झांज दोन्ही हातांनी एकाच वेळी वाजवत सायकल चालविण्याची एक असाधारण कला त्यांच्यापाशी आहे.
श्रीलाल गेल्या २७ वर्षांपासून त्यांच्या सायकलवरून दररोज दोन फेऱ्या मारतात - सकाळी तिथल्याच जवळच्या बाजारात मासे विकण्यासाठी आणि दुसरी सायकलवर मागे लावलेले ढोल आणि झांज वाजवत शांतिनिकेतनच्या रस्त्यांवरून फिरण्यासाठी. श्रीलाल सायकलवरून रोज सहा किलोमीटर वाद्य वाजवत हा अनोखा प्रवास करतात.



