३७ वर्षांचा गनी सामा गुजरातमधील ‘नल सरोवर’ तलाव आणि पक्षी अभयारण्यातील निसर्ग अभ्यासक आणि नाविक आहेत. अहमदाबाद जिल्ह्यातील विरमगाम तालुक्यात १२० चौरस किमी अंतरावर विस्तारलेला हा तलाव अनेक स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करतो. हे पक्षी मध्य आशियाई हवाई-मार्गावरून येतात जो आर्क्टिक महासागर ते हिंदी महासागर असा अथांग पसरलेला आहे.
“मी पक्ष्यांच्या ३५० प्रजाती ओळखू शकतो,” ते सांगतात, त्यात नल सरोवरावर येणाऱ्या अनेक स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे. “आधी, इथे पक्ष्यांच्या २४० प्रजाती आढळायच्या, आता हा आकडा ३१५ पार गेला आहे.”
गनीचं बालपण तलावाच्या परिसरातच गेलं. तो म्हणतो, “माझे वडील आणि आजोबा वनविभागाला पक्ष्यांच्या संरक्षणासाठी मदत करत. ते दोघंही वनविभागात नावाडी म्हणून काम करत आणि आता मी देखील तेच काम करतोय.” तो एक आठवण सांगतो, “१९९७ मध्ये मी कामाला सुरुवात केली, तेव्हा मला कधीकधी काम मिळायचं, तर कधीकधी काहीच नाही.”
२००४ मध्ये परिस्थिती बदलली, जेव्हा वन विभागाने त्याला गस्त घालण्यासाठी आणि पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी नावाडी म्हणून कामावर घेतले. “आता तो महिन्याला साधारण १९,००० रुपये कमावतो.”










