पावसानंतर मुस्केनीची हिरवी पानं अगदी गोड लागतात. उन्हाळ्यात ही पानं सुकतात आणि कडक होतात,” कौशल्याताई सांगते. तिच्या दोन खोल्यांच्या व्हरांड्यात उभी राहून ती सांगत होती. बोलता बोलत, ती तुरीची डाळ धुवून घेते. डाळ, मुस्केनी त्यात ती एक दोन हिरव्या मिरच्या, हळद आणि मीठ घालून सर्व कुकरला लावते.
“मुस्केनीची भाजी तुरीच्या किंवा हरभऱ्याच्या डाळीबरोबर चांगली लागते,” कौशल्या आनंदाने मुस्केनीची भाजी करायच्या वेगवेगळ्या पद्धता सांगते. ‘मुस्केनी’ ही छत्तीसगढ मध्ये येणारी रानभाजी आहे आणि ती नेहमी एखाद्या डाळीबरोबरच केली जाते. कुकरच्या दोनतीन शिट्टया होतात. तोपर्यंत लसणाच्या पाकळ्या आणि थोड्या लाल मिरच्या घेतल्या. विळीवर कांदा आणि टोमॅटो चिरून घेतले.













