“मला अशी आई व्हायचं होतं, जी सकाळी मुलांना शाळेसाठी उठवेल, त्यांच्यासाठी चांगलं जेवण बनवेल, त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवेल. पण मला हे शक्य होत नाही. कारण माझी मुलं उठवण्यापूर्वी चार तास आधीच मला घर सोडावं लागतं आणि मी रात्री घरी येईपर्यंत ती झोपी गेलेली असतात. अख्खा आठवडा मी रविवार येण्याची वाट पहाते. जेणेकरून मला ८ तासाची झोप, दिवसातून तीन वेळा जेवण आणि मुलांसोबत थोडा वेळ घालवता येईल,” अमुलू मला सांगत होती. आजचा दिवस अजून संपायचा होता आणि आम्ही बोलता बोलता उत्तर चेन्नईच्या थिरुवोट्रियुर परिसरातल्या एका अरुंद रस्त्यावरून चालत होतो. ती भाजीपाला भरलेली हातगाडी ढकलत होती आणि मी कॉलेजमधून घरी परत येत होते.
मी सकाळी कॉलेजसाठी बाहेर पडले तेव्हा तिला पाहिलं होतं आणि आता दुपारी परत आले तेव्हाही अमुलू रस्त्यावर भाजीपाला विकत होती. पूनम साडी ती नेसली अमुलू भाजीपाला भरलेली जवळपास १०० किलो वजनाची हातगाडी ताकदीनं ढकलत होती. हा २०२४ चा उन्हाळा आहे. तिरुवल्लूर जिल्ह्यातलं तापमान आता ४० अंश सेल्सिअसच्या वर पोहोचलंय आणि या हंगामातल्या सर्वात उष्ण दिवसाची नोंद ४४.३ अंश सेल्सिअस झाली आहे. पण ४१ वर्षांच्या अमुलूवर याचा काहीच परिणाम झाला नाहीये. भारतातल्या १ कोटी फिरत्या विक्रेत्यांपैकी म्हणजे ४० टक्के महिला आणि ६८ टक्के पथविक्रेत्यांपैकी ती एक आहे, जिला उष्णतेशी सामना करावा लागतोय. पण तरीही ती उष्णतेच्या लाटांमध्ये आराम न करता काम करते आणि बऱ्याचदा तिला दुपारचं जेवणही नसतं.






















