मलाय दासगुप्ता हे एक स्वतंत्र माहितीपट निर्माता आहेत. कलकत्ता मीडिया इंस्टिट्यूट येथे ते प्रसारण व्यवस्थापन विभागात आहेत. त्यांनी निर्मिती व दिग्दर्शन केलेले लोककला व संस्कृती, संगीत आणि पर्यावरण अशा विषयांवरील अनेक चित्रपट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाले आहेत.