उत्तराखंडच्या ग्रामीण भागात बांबूच्या वस्तू तयार करणारे नैन राम बाजेला सांगतात की त्यांच्या कामासाठी अंगात चिकाटी पाहिजे, एखाद्या कलेला लागते तशी. आताशा फार पैसा मिळत नाही आणि शासनाचं काहीच सहाय्य नाही त्यामुळे त्यांची मुलं मात्र आता या कामातून बाहेर पडली आहेत