जिशा एलिझाबेथ तिरुवनंतपुरम येथील माध्यमम या मल्याळी दैनिकामध्ये उप-संपादक-वार्ताहर म्हणून काम करतात. त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००९ मध्ये केरळ सरकारचा डॉ. आंबेडकर माध्यम पुरस्कार, एर्णाकुलम प्रेस क्लबतर्फे दिला जाणारा लीला मेनन स्त्री पत्रकार पुरस्कार आणि २०१२ मध्ये भारतीय प्रतिष्ठानाची फेलोशिप हे त्यातले काही. केरला युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्स या संघटनेच्या जिशा नियुक्त सदस्य आहेत.