आंध्र प्रदेशातील पेडाणात हातमागावर काम करणारे बहुतेक विणकर म्हातारे आहेत. आणि तीच स्थिती आहे कापडावर कलमकारी छपाई करणाऱ्या कामगारांची. - राज्य सरकारकडून कोणतंही सहाय्य नसल्याने आणि तुटपुंज्या उत्पन्नामुळे दोन्ही उद्योगांवर परिणाम झाला आहे. परिणामी, नवीन पिढीला कामासाठी स्थलांतर करण्याशिवाय गत्यंतर नाही.