
साध्यासुध्या माणसांचं रोजचं जगणं हा पारीचा गाभा आहे. भारताच्या गावपाड्यांमध्ये दिसणारं वैविध्य या पृथ्वीतलावर क्वचितच इतर कुठे पहायला मिळेल. इथले ८ कोटी ३३ लाख लोक जवळपास ८०० भाषा बोलतात. त्यांच्या उपजीविका, कला, संस्कृती, परंपरा, साहित्य आणि कहाण्यांची गणती अशक्य आहे...

पारीवरचा मजकूर १५ भाषांमध्ये प्रकाशित होतो. आपल्या देशातल्या १ अब्ज २० कोटी लोकांच्या या मातृभाषा आहेत. अख्ख्या जगात पत्रकारितेच्या क्षेत्रातलं हे सर्वात मोठं बहुभाषिक काम आहे. पारीच्या वेबसाइटवर सर्व भाषा समान आहेत. समान मानल्या जातात...

वाचनालय म्हटलं की पुस्तकं घेण्यासाठी अटी-शर्ती असतात. पण पारी वाचनालयातली पुस्तकं तुम्ही मोफत डाउनलोड करून घेऊ शकता. इथे अनेक अहवाल, महत्त्वाची गॅझेट, प्रती उपलब्ध नसलेली दुर्मिळ पुस्तकं आणि कागदपत्रं आणि बरंच काही आहे...

भारतीय पत्रकारिता विश्वातला पारी हा सर्वात धाडसी प्रकल्प आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी तुमची मदत फार मोलाची आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन वार्तांकन करण्यासाठी तुमचं आर्थिक पाठबळ आम्हाला हवं आहे. ग्रामीण भारतासंबंधीचा हा आगळा वेगळा ज्ञानसंग्रह तयार करण्यासाठी सढळ हाताने मदत करा...

आजच्या तरुणाईला त्यांचाच देश नीट माहिती होणं गरजेचं आहे. त्यांच्यसोबत शाळांमध्ये सत्रं, कार्यशाळा, आमच्यासोबतच्या इंटर्नशिप्समधून या एकाच भारतात नांदत असलेले अनेक भारत त्यांना कळावे म्हणून आम्ही प्रयत्न करतो. या विद्यार्थ्यांचं वार्तांकन आम्ही नियमितपणे पारीवर प्रकाशित करतो...